बहीण-भावाचा रक्षाबंधन सण माहिती पाहा मराठी लेखाद्वारे


 नमस्कार मित्रांनो,

सर्वप्रथम सर्वांना ओम श्री गुरुदेव दत्त .


मित्रांनो आज आपण रक्षाबंधन या सनाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.हा सण श्रावण महिन्यातील पर्णिमेच्या दिवशी येतो.


रक्षाबंधन हा सण आपल्या भारत देशात सर्वजण उत्साहाने साजरा करतात.तसेच देशातील विविध जातींचे, धर्माचें लोक एकत्र येऊन साजरा करतात.


तसेच रक्षाबंधन या सणाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात.


रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन होय.या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते.आणि भाऊ त्या बहिणीला कोणती तरी भेटवस्तु देतो.

असा हा सण नुसता राखीचा नसून,तो बहीण-भावाच्या नात्याचे प्रतीक आहे.तसेच बहीण-भावामध्ये नाते टिकून राहण्यासाठी आपल्या भारत देशात असे सण केले जातात.


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बहीण आणि भाऊ हे एका रक्ताचेच असावे असे नाही.ते बहीण-भाऊ मानलेले असले तरीही चालतात.


अश्याप्रकारे रक्षाबंधनाचा सण बहीण-भाऊ अति उल्हासाने करतात.


धन्यवाद !

Post a Comment

0 Comments