दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
अनुसया व अत्रिऋषी यांचा पुत्र दत्तात्रय. "अत्री चा दत्त म्हणजे दत्तात्रय."
तसेच दत्त म्हणजेच देणारा असा पण त्याचा अर्थ होतो.
दत्तात्रयाची जन्मतिथी मार्गशीर्ष महिना त्यामध्ये शुक्ल पौर्णिमा व सूर्यास्ताची वेळ होती.हा मार्गशीर्ष महिना हिंदू कालगननेतील 9 वा महिना आहे. 9वा महिना म्हणजे अर्भकाची परिपूर्ण आवस्था होय.
श्री दत्तात्रय महाराज यांचा जन्म हिवाळा या ऋतूमध्ये झाला.दत्त महाराज यांच्या मते हिवाळा ऋतु "शांत डोक्याने जीवनातील सर्व निर्णय घ्यायला शिकवतो."
अशा या दिव्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या श्री दत्तात्रय महाराज यांचा अवतार अविनाशी आहे.श्री दत्त महाराजांचा अवतार हा गुरू अवतार आहे. या जगाला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाची सतत गरज लागणार आहे.म्हणूनच श्री दत्ताच्या अवताराला समाप्ती नाही.या दत्त महाराजांचा अवतार सतत, चिरंतर व अखंड असाच आहे.
"अवतार अनंत होती परी ते विलया जाती |
गुरू अवतार दत्तमुर्ती नाश या अवतारा असेना ||"
दत्तगुरुच्या पायामध्ये पादुका,हाती जपमाळ, एका हाती कमंडलू व डोक्यावरील जटा पाहून एक चांगल्या प्रकारे भव्यता, दिव्यता असे विलक्षण दिसून येतात.
'तीन शिरे सहा हात' हे दत्ताचे स्वरूप समजून घेणे गरजेचे आहे. सर्वात तळाचे दोन हात ब्रम्हाचे असून, उजव्या हातातील जपमाळ सोहम चे प्रतीक आहेत.त्या हाताला यजुर्वेद मानले जाते.श्री दत्ताच्या डाव्या हातात कमंडलू असून तो ज्ञानयोगाचे प्रतीक आहे.हा हात ' ऋग्वेद ' आहे.
श्री दत्ताचे मधले दोन हात हे श्री शंकराचे आहेत.त्यातील उजव्या हातात डमरू असून तो 'सामवेद'मानला जातो.तर डाव्या हातातील त्रिशूळ हठ्योगाचे प्रतिनिधित्व करतो.
श्री दत्ताचे वरचे दोन्ही हात श्री विष्णूचे असून उजव्या हातात शंख आहे.हा शंख योगाचे प्रतीक आहे. तो हात 'अथर्ववेद ' आहे. आणि डाव्या हातात चक्र आहे.
"श्री दत्ताच्या हातातील वस्तू स्वानंदपूरत्या मर्यादित नाहीत,तर त्या विश्व कल्याणासाठी आहेत."
तसेच श्री भगवान दत्तप्रभूच्या पादुका किंवा खडावामध्ये सरस्वती व लक्ष्मीचे अधिष्ठान आहे.
दत्त महाराजांचे नेत्र तेज:पुंज आहेत. अवधूताच्या नेत्रातून दिव्य तेजाची किरणे अखंड वाहत असतात.
दत्त महाराजांचे अवतार घेतलेले ठिकाण अनेक आहेत.परंतु त्यामध्ये सर्वात जास्त मुख्य ठिकाण 2 आहेत.
1) गाणगापूर हे ठिकाण कर्नाटक राज्यामध्ये आहे.
2) गिरनार(जुनागढ)हे ठिकाण गुजरात या राज्यामध्ये आहे.
हे दोन ठिकाण दत्त गुरूचे मुख्य आहेत. आणि हे ठिकाण पर्यटन स्थळे नाहीत.येथे सांसारिक आनंदाच्या हेतूने जर कोणी आले तर,त्याची थोर निराश्याच होईल.
दत्त महाराज तर आसुरी वृत्तीचा (राक्षसांचा)नाश करण्यासाठी व दैवी प्रवृत्तीचे संरक्षण करण्यासाठी आवतरले आहेत.म्हणूनच त्यांच्या हाती चक्र, गदा,त्रिशूळ अशी संहारक आयुधे आहेत.शंख, पदम व कमंडलू धारण करणारे श्रीदत्त त्या सच्चीतानंद परमेश्वराचे प्रतक्ष रूपच आहे.
सर्व आयुध्यांच्या बरोबरीने आपल्या डाव्या हातात भिक्षेची झोळी घेऊन संचार करणारे भगवान दत्तात्रय महाराज आपल्या कटक्ष्याने भक्तांना मुक्ती प्रदान करतात.
ओम श्री गुरुदेव दत्त !
https://dattagiri.blogspot.com/2022/06/blog-post.html
0 Comments