शिष्याची खरी गुरुभक्ती, पाहूया या मराठी लेखाद्वारे!


गोरक्षनाथांची गुरुभक्ती

एका दिवशी गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांना भुख लागली होती. तेव्हा त्यांचे शिष्य गोरक्षनाथ त्यांच्याजवळ होते. मच्छिंद्रनाथ महाराजांनी गोरक्षनाथास आदेश दिला की,मला भूख लागली आहे आणि तु गावात जाऊन भिक्षा मागून आण.गुरुचे आदेश ऐकून गोरक्षनाथ निघाले.


गोरक्षनाथ जाते वेळेस एका ब्राह्मणाच्या घरी गेले. तिथे जाऊन अल्लख निरंजन म्हणून भिक्षा मागितली. तेव्हा घरातून एक स्त्री आली आणि गोरक्षनाथा कडे भरपूर भिक्षा दिली.त्या घरी भरपूर भिक्षा दिल्यामुळे गोरक्षनाथ त्यांच्या गुरुकडे निघाले.


गुरुकडे गेल्यानंतर गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांनी जेवण पोठभरून केले,पण त्यांना त्या जेवणातील वडे त्यांना फार आवडले.आणि म्हणाले वडे किती चांगले आहेत. "आणखी वडे खाण्याची इच्छा माझी आहे".


आपल्या गुरूची इच्छा ऐकून गोरक्षनाथ पुन्हा त्या स्त्रीच्या घरी गेले.आणि म्हणाले की,तुम्ही जी भिक्षा दिली त्या भिक्षेमधील वडे माझ्या गुरूंना खूपच आवडले.आणि माझे गुरू मला म्हणाले आणखी वडे मला खाण्याची इच्छा आहे म्हणून मी वडे गुरूसाठी नेण्यासाठी आलो आहे.


गोरक्षाचे बोलणे ऐकून ती स्त्री फार रागात आली आणि म्हणाली,तुला सज्जन, चांगला समजून तुला चांगले पदार्थ भिक्षेस वाढले,पण तू तर लबाड दिसतोस.तुला जर वडे खायचे असतील तर गुरूच नाव का सांगतोस?

गोरक्षनाथ त्या स्त्रीला विनवणी करू लागले.


ते ऐकून स्त्री म्हणाली,तू एवढी गुरूची भक्ती करतोस तर मी मागेन ते मला दे! म्हणजे माझ्याकडील वडे आणखी तुला देईन. "गोरक्षनाथ म्हणाले,तुला काय हवं आहे माग माई, माझ्या गुरुसाठी मी काहीही देण्यास तयार आहे".


त्या स्त्रीने गोरक्षनाथाची परीक्षा घ्यायची ठरवली. आणि म्हणाली,तुझा एक डोळा मला दे! गोरक्षनाथ ऐकताच क्षणी एका डोळ्यात बोटे खुपसून डोळा काढून दिला. गोरक्षनाथांचे रक्त भळभळा वाहू लागले.ते पाहून स्त्री घाबरली आणि मनात बोलू लागली हा कुणी साधारण माणूस नसून कोणीतरी विद्वान महापुरुष आहे.असे स्त्रीने ओळखिले.


स्त्री पटकन उठून घरात गेली.तिच्याजवळ असलेले वडे त्या गोरक्षनाथास दिले. आणि गोरक्षनाथाचे पाय त्या स्त्रीने धरले. व म्हणाली,"मला क्षमा करा महाराज"मला तुमचा डोळा नको. कृपा करून माझ्यावर तुम्ही रागावू नका.


गोरक्षनाथ आपल्या गुरुकडे हातामध्ये वडे घेऊन निघाले.लगेचच महाराजांकडे गेले म्हणाले,"हे घ्या वडे गुरू महाराज.

मच्छिंद्रनाथ महाराज यांनी पाहिले की,गोरक्षनाथांनी एका डोळ्याला हात का लावला? लगेचच मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, एक डोळा का झाकला आहेस?

गोरक्षनाथांनी आपल्या गुरूला कसल्याही प्रकारची किसळ वाटू नये.यासाठी गोरक्षनाथ काही न म्हणता.हात लावून डोळ्याला उभा राहिला.आणि म्हणाला काही नाही डोळ्याला जरासा ठणका लागला आहे. आणि तुम्ही वडे खाऊन घ्या असे गोरक्षनाथ म्हणाले.


तेव्हाच मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले,"जो पर्यंत तू तुझा डोळा दाखवत नाहीस, तो पर्यंत मी हे वडे खाणार नाही."

लगेचच गोरक्षनाथांनी हात डोळ्यावरचा काढला.गुरू मच्छिंद्र महाराजांना रक्ताची धार व डोळ्याची खोबन (डोळा काढल्या नंतर दिसणारा भाग) दिसली. आपल्या शिष्याची गुरूभक्ती पाहून मच्छिंद्रनाथ महाराज गहीवले. व त्यांनी संजीवनी मंत्राच्या साह्याने गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा जशाच तसा बसवला.

खरी ती गुरुभक्ती.


जर हा लेख तुम्हाला आवडला असेल तर like करायला विसरू नका.तसेच comment करायला सुद्धा विसरू नका.आणि तुमच्या मित्रांना shere करा.

धन्यवाद!

Post a Comment

1 Comments